एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, मॅश केलेले बटाटे, कांदा, धणे, जिरे, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ एकत्रित करावे. हे सर्व मिक्स केल्यानंतर मध्यम गोळे बनवा. आता नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गोळे तळून घ्या. यानंतर एका मोठ्या भांड्यात थोडे तूप गरम करावे. व त्यामध्ये तमालपत्र, लवंगा, वेलची, दालचिनी आणि जिरे टाकून तडतडू द्या. त्यात कांदा घालावा. भिजवलेले तांदूळ गाळून भांड्यात टाकावे. तसेच तांदूळ मसाल्यांचा सुगंध शोषून घेण्यासाठी परतवून घ्यावा. आता भातामध्ये पाणी, मीठ आणि गरम मसाला घाला. तसेच उकळी येऊ द्या. मग झाकण ठेवून शिजवावे. शिजवलेल्या पुलावात कोफ्ते घालून मिक्स करा. आणखी 3 मिनिटे मंद गॅसवर शिजवा. तर चला आपला कोफ्ता पुलाव तयार आहे. लोणच्यासोबत देखील सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.