कांदा मेथी

साहित्य- मेथी दाणे (५० ग्रॅम), कांदे (चार ते पाच), राई, जीर, तेल, चिमूटभर साखर, मसाला, हळद, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ.

कृती- मेथीचे दाणे रात्रभर किंवा सात ते आठ तास भिजत ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात राई-जीऱ्याची फोडणी द्यावी. कांदा लालसर परतून घ्यावा, मग त्यात लाल मसाला, हळद, मीठ घालून परतावे. मेथीचे दाणे घालावे व चिमूटभर साखर घालून तेलात थोडेसे शिजू द्यावे. थोडंसं पाणी घालून चांगले शिजू द्यावे. त्यावर गरम मसाला घालून मेथी कांदा सव्‍‌र्ह करा.

वेबदुनिया वर वाचा