How to MaKe Soft Roti या प्रकारे बनवा मऊ पोळ्या, तासोंतास राहतील नरम

सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (13:01 IST)
आईच्या हातची गरमागरम पोळी खाण्यात एक वेगळाच आनंद असतो. ती काही घालत नाही, तरी पोळी छान लागते. शिवाय पोळी फुगते आणि मऊ होते. पण जेव्हा आपण पोळी बनवतो तेव्हा ती जळू लागते, फुगत नाही आणि मऊ देखील होत नाही. योग्य पोळीसाठी योग्यरीत्या पीठ मळून घेणे फार महत्वाचे आहे. ही एक अशी कला आहे जी जर तुम्ही समजून घेतली आणि शिकली तर तुमच्याही पोळ्या चांगल्या बनतील.
 
पीठ घट्ट मळून घेतले तर पोळी देखील तशीच बनते आणि आणि जर पीठ सैल असेल तर पोळी तुटते आणि नीट बनत नाही. मग आपण काय करणार? तर अशा परिस्थितीत काही सोप्या युक्त्या वापरून पहा आणि फक्त 3 गोष्टींनी आपले पीठ मळून घ्या. यामुळे तुमची कणिक तर चांगली होईलच पोळ्याही चांगल्या होतील.
 
पीठ कसे मळायचे हे जाणून घेणे आवश्यक आहे. ही युक्ती सोपी आहे. फुगलेली पोळी रोटी बनवण्‍यासाठी 3 पदार्थांची आवश्‍यकता असेल.
 
प्रथम तूप घाला- मऊ पोळ्यांसाठी जेव्हा तुम्ही पीठ मळून घ्याल तेव्हा ते चाळून घ्या आणि प्रथम त्यात 1 टीस्पून तूप घाला. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा जेव्हा आई पोळी किंवा पराठ्यावर तूप घालते तेव्हा ती मऊ होते आणि छान लागते. म्हणून प्रथम आपल्या पीठात तूप घाला आणि नंतर पुढील प्रक्रिया सुरू करा. तूप घालून पीठ चांगले मळून घ्या. त्यामुळे गोळे होणार नाहीत आणि पोळी बनवायला सोपी होईल.
 
दूध मिसळा- मऊ पोळीसाठी दूध हा असाच एक घटक आहे जो पोळ्यांना मऊ होण्यास मदत करतं. जर तुम्हाला मऊ पोळी तयार करायची असेल तर पीठ मळताना दूध घाला. पीठ मळताना दूध थोडे कोमट करून नंतर हळूहळू पिठात ओतून पीठ चांगले मळून घ्या. जर तुम्हाला पोळी, पराठा, पुरी मऊ बनवायची असेल तर कोमट दूध त्यासाठी उत्तम काम करते.
 
मीठ घालून मळून घ्या- शेवटची पायरी म्हणजे पिठात चिमूटभर मीठ घालून ते पाण्याने मळून घ्यावे. मीठ तुमच्या पोळीत चव वाढवते. त्यानंतर आपले पीठ चांगले मळून घ्या. आपले पीठ खूप घट्ट आणि सैल नसावे याची काळजी घ्या. आपल्या बोटाने ते मळण्याचा प्रयत्न करा आणि जर ते घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालून थोडे अधिक मळून घ्या. यानंतर तुम्ही तुमचे पीठ किमान 10 मिनिटे झाकून ठेवावे.

या टिप्स वापरून पहा आणि पोळी बनवा आणि पहा की तुमची पोळी नक्कीच मऊ आणि स्वादिष्ट होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती