Gujarati Kachori Recipe :गुजरात स्टाईल कचोरी रेसिपी जाणून घ्या

सोमवार, 5 जून 2023 (21:46 IST)
सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहासाठी काही स्वादिष्ट स्नॅक्स शोधत असाल, तर न्याहारीसाठी गरम कचोरी हा सर्वोत्तम पर्याय आहे. कचोरी तुमची भूक भागवेल तसेच चव दुप्पट करेल.यावेळी तुम्ही गुजराती स्टाइलची कचोरी प्रत्येक वेळेपेक्षा वेगळी बनवू शकता. गुजराती पदार्थाची चव खूप रुचकर असते. गुजराती कचोरी चवीसाठी प्रसिद्ध आहे. गुजराथी स्टाइल कचोरी तुम्ही घरी सहज बनवू शकता. 
चला साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य:
भाजलेले बेसन, हिंग, साखर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, आमसूल  पावडर,  बडीशेप, तेल, मैदा, मीठ 
 
कृती-
गुजराती स्टाइल कचोरी बनवण्यासाठी प्रथम बेसन मंद आचेवर तळून भाजलेले बेसन तयार करा. 
 आता एका भांड्यात भाजलेले बेसन काढा आणि त्यात चिमूटभर हिंग, साखर, गरम मसाला, हळद, आमसूल पावडर, मीठ, तेल, बडीशेप आणि लाल तिखट मिसळून सारण तयार करा.
आता मैद्यात मीठ, तेल मिसळून कणिक मळून घ्या आणि कणिक झाकून ठेवा. 
आता या पिठाच्या लहान गोळ्या करा. या पिठात आधी तयार केलेले सारण भरून लाडू बनवा नंतर ते लाटून घ्या.
आता कढईत तेल तापवायला ठेवा आणि तेल गरम झाल्यावर कचोऱ्या तळून घ्या.
गरम कचोरी हिरव्या चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा. 
 



Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती