सर्वप्रथम खवा आणि पनीरला किसून घ्या. त्यात साखर मिसळा, कढईत मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर व्हॅनिला एसेन्स आणि वेलची पूड टाकून मिसळा आणि गॅस बंद करा.
आता या तयार सारणाला 3 सम भागात वेगळं करा. पहिल्या भागाला पांढरेच राहू द्या. दुसऱ्या भागात गोड पिवळा रंग आणि तिसऱ्या भागात गोड हिरवा रंग मिसळा. हळुवार हाताने जाडसर लाटून घ्या आणि सर्वात खाली हिरवा, नंतर पांढरा आणि सर्वात वरील बाजूस पिवळा रंग जमवा आणि हळुवार हातांनी दाबून चांदीचा वर्ख लावा. आता याला चौरस आकार किंवा लहान लहान आकारामध्ये कापून घ्या. नव्या चवीसह असलेली तिरंगी बर्फी खाण्यासाठी तयारआहे.
सर्वप्रथम पनीर, बटाटा, कांदा, ढोबळी मिर्च फ्लॉवर इत्यादी भाज्यांना चिरून तळून घ्या. गाजर आणि वाटाणे उकळवून घ्या. तांदळात मीठ घालून शिजवून घ्या आणि शिजवून झाल्यावर त्याचे 3 भाग करा.
एकामध्ये खाण्याचा हिरवा रंग , एकामध्ये खाण्याचा गोड पिवळा रंग आणि तिसऱ्या भागाला पांढराच असू द्या. हिरव्या भागात हिरवे वाटाणे, ढोबळी मिर्च, पिवळ्या तांदळात गाजर आणि टूटी फ्रुटी आणि बटाटे घाला.
पांढऱ्या तांदळात पनीर, फ्लॉवर, कांदा मिसळा. कढईत तेल टाकून गरम करून त्यात वाटलेल्या मसाल्यांना 5 मिनिटे परतून तिन्ही प्रकारच्या तांदुळात घाला. एका वाटीत या तीन रंगी पुलाव ला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
----------------------------------------------------------------------------------------
सर्वप्रथम पनीरला 3 भागात कापून घ्या. प्रत्येक थरांवर, हिरवी पुदिना चटणी, लोणचं मसाला, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस लावून एकावर एक असे ठेवा. त्या नंतर हरभरा डाळीचे पीठ, तेल, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला मिसळून या घोळाला 5 मिनिटे ढवळा. या घोळात पनीरला बुडवून तळून घ्या आणि त्याचे 2 भाग करा.
आता एका कढईत तेल गरम करून जिरं -मोहरी घाला. त्यात आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्युरी घालून चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवा. दह्याला फेणून त्यावर टाका आणि त्यावरून रंग बेरंगी पनीर घालून 1 - 2 वेळा उकळी घ्या. पाण्याची गरज असल्यासच घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पोळी किंवा पराठ्यांसह चविष्ट मसालेदार तिरंगा पनीर सर्व्ह करा.
1 किलो बटाटे, 1 किलो वाटाणे, 1/2 किलो छेना, 1 मोठा चमचा मैदा, 200 ग्रॅम ब्रेडक्रम्स, 6 चमचे मीठ, साढे तीन चमचे आमसूल पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला,1 चिमूटभर हिंग, 2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचा साखर, 2 इंच आल्याचे तुकडे, 9 ते 10 हिरव्या मिरच्या, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
कृती :
बटाटे उकळवून सोलून मॅश करा. 2 चमचे मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस टाका, छेन्यात 1 चमचा मीठ,1 चमचा हळद,1 चमचा बारीकआल्याचे तुकडे आणि 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून मिसळावे.
वाटाणेच्या दाण्यांना उकळवून जाडसर वाटून घ्यावं(वाटाणे कच्ची असल्यास उकळवु नये). एका भांड्यात वाटाणे 1 चमचा मीठ, गरम मसाला, हिंग, आमसूल आणि साखर घालून शेकून घ्यावं.
आता कटलेटाच्या तिन्ही वस्तू सम प्रमाणात तयार आहे. छेना, बटाटे आणि मटार वेग वेगळ्या 15 -15 भागात कापून घ्या छेन्याला अंडाकृती आकार द्या.
मटारला हातावर घेऊन पुऱ्यांचा आकार देऊन छेन्यावर चांगल्या प्रकारे गुंडाळा, यावर बटाट्याची पुरी बनवून गुंडाळा. मैद्याला 1 /2 कप पाण्यात घोळून कटलेट्सच्या अवती भोवती लावून ब्रेडक्रम्ब्स मध्ये चांगल्या प्रकारे गुंडाळून मोठ्या आंचेवर तांबूस रंग येई पर्यंत तळावे. थंड झाल्यावर सुरीने मधोमध कापा. आणि टोमॅटो सॉस सह सर्व्ह करा.
सर्वप्रथम तांदूळ, हरभराडाळ आणि उडीद डाळला 2 तास पाण्यात भिजवून ठेवावं. चांगल्या प्रकारे भिजल्यावर मिक्सीमध्ये वाटून घ्या. या मिश्रणाला एकसारखं मिसळा. आता या घोळाचे 3 भाग करा आणि त्यामध्ये मीठ, साखर, आणि इनो पावडर टाकून मिसळा.
या घोळाचे परत 3 भाग करा. एकात लाल, दुसऱ्यात हिरवा आणि तिसऱ्या भागात पिवळा खाण्याचा रंग घाला. आता कुकर मध्ये अंदाजे पाणी घाला की घोळ असलेल्या भांड्यापर्यंत पाणी येऊ नये. भांड्याला आतून तेल लावून सर्वात आधी हिरवा घोळ घाला आणि 2 मिनिटे गरम होऊ द्या. या नंतर लाल आणि मग शेवटी पिवळ्या रंगाचा घोळ टाका. या भांड्याला कुकरमध्ये ठेऊन झाकण लावावं. मोठ्याआंचेंवर 15 मिनिटे शिजवावं.
थंड झाल्यावर सूरीने कापून घ्या आणि एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहऱ्या,कढीपत्ता टाकून ढोकळ्याला फोडणी द्या.गरमागरम ढोकळे हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.