योग्य जागेवर स्टोअर करा खाद्यपदार्थ

सोमवार, 11 मे 2015 (14:47 IST)
कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे. प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. याव्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये. ते लवकर खराब होतात.

* कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

* कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावं. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नाही. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत.

* टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. 

वेबदुनिया वर वाचा