किचन टिप्स

पनीर: कोणत्याही रेसिपीमध्ये पनीर वापरायचे असल्यास आधी उकळलेल्या गरम पाण्यात थोडं मीठ घालून पनीरचे क्यूब्ज 10 ते 15 मिनिटे टाकून ठेवा. नंतर निथरून वापरा. पनीर अगदी सॉफ्ट लागेल.

दीर्घकाळासाठी पनीर ताजं ठेवायचं असेल तर ते ब्लॉटिंगपेपरमध्ये गुंडाळून मग फ्रीजमध्ये ठेवावं.
दूध: मंद आचेवर दूध तापवताना त्यात एक चमचा किंवा जास्त दूध असल्यास एक बशी बुडवून ठेवल्याने दूध पातेल्याला चिकटत नाही.

दूध उकळल्यावर त्यात एक चमचा सोडियम बायकाबरेनेट घातल्याने दूध नासत नाही.

वेबदुनिया वर वाचा