काकडीची भाजी

सोमवार, 27 जून 2016 (15:32 IST)
साहित्य : 2 काकड्या, तेल, तिखट, मीठ, जीरे, मोहरी, हळद, तिखट किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 चमचा गूळ, शेंगदाणे, खोबरं, खसखस. 
 
कृती : काकडी सोलून त्याच्या मोठ्या फोडी कराव्यात. फोडणीत जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घातल्यावर काकडी टाका. मीठ, तिखट, चिरलेला गूळ घालून परता. एक सारखं झाल्यावर शेंगदाणे, खोबरं, खसखस टाकावी. काकडीच्या फोटी शिजू देऊ नयेत. लहान मुलांना त्यांच्या डब्यावर देण्यासाठी झटपट आणि जीवनसत्त्वयुक्त ही भाजी त्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही. आवडीनुसार वरून सॉसही देऊ शकता.

वेबदुनिया वर वाचा