कांद्याचा भात

साहित्य : तांदूळ, कांदे, लाल मिरची, शेंगदाणे, तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, खोबरे, कोथिंबीर, लिंबू.
 
कृती : तांदूळ तासभर धुऊन निथळत ठेवावे. कांदे जास्त घेऊन लाल मिरच्या बारीक वाटाव्यात. खोबरे किसून घ्यावे. कोथिंबीर चिरून घ्यावी, तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात वाटलेले कांदे, शेंगदाणे, तांदूळ, मीठ घालून परतावे. भात शिजल्यावर किसलेले खोबरे, कोथिंबीर घालून वाढावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती