वाढती लोकसंखया आणि जागेच्या अभावामुळे फ्लॅटस् स्कीमची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकाच बिल्डींगमध्ये अनेक फ्लॅटस् असल्या कारणाने प्रत्येक फ्लॅटची आंतरीक आणि बाहेरील रचना वास्तुशास्त्रानुसार राहत नाही. काही बिल्डर स्वतःच्या फायद्याकरीता वास्तुशास्त्राच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन फ्लॅटस् निर्माण करतात आणि परिणाम स्वरुप फ्लॅटस् धारकांना दुःख, त्रास, शरीरासंबंधी रोग, मानसीक त्रास, कलह इत्यादींना बळी पडावे लागते. परंतु जर आपण वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवून फ्लॅट खरेदी केला तर नक्कीच आपण आपल्या स्वतःच्या घराचा आनंद घेवू शकतो.