पितृ नाराज असल्याचे संकेत समजून घ्या, अशा वेळी करा हे उपाय

आपल्या जीवनात सुख-शांती नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कधीही पैशाची कमतरता भासू नये यासाठी लोक कठोर परिश्रम देखील करतात, परंतु काहीवेळा कठोर परिश्रम करूनही एखाद्या व्यक्तीला यश मिळत नाही किंवा कष्ट करून पैसे मिळत नाहीत, परंतु या ना त्या कारणाने घरात तणाव आणि अशांतता कायम असते. पैसा येतो, पण लवकरच तो खर्चही होतो. याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा तुमचे मृत पूर्वज देखील घरातील समस्यांचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जाणूनबुजून किंवा नकळत तुमच्याकडून अशा काही चुका घडतात, ज्यामुळे तुमचे पूर्वज रागावतात आणि तुम्हाला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. तथापि जेव्हा पूर्वज रागावतात तेव्हा व्यक्तीला काही चिन्हे मिळू लागतात. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या लक्षणांमुळे पूर्वजांना राग येतो...
 
विनाकारण कलह
घरामध्ये विनाकारण कलह वाढत असल्यास पितृदोष असू शकतो. जर तुमच्या घरात विनाकारण भांडण होत असेल. जर कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील तर ते पितृदोषाचे कारण असू शकते. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमचे पूर्वज काही कारणास्तव रागावले आहेत.
 
कामात अडथळे
जर एखाद्या कामात वारंवार अडथळे येत असतील किंवा मेहनत करूनही तुम्हाला कोणत्याही कामात यश येत नसेल तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत.
 
विवाहात अडथळे
जर कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी विवाहयोग्य असतील, परंतु त्यांच्या विवाहात वारंवार अडथळे येत असतील किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत.
 
व्यर्थ नुकसान
वास्तु तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या कामात अचानक नुकसान होत असेल किंवा घरातील सदस्यांना पुन्हा पुन्हा अपघात होत असतील तर याचा अर्थ पितरांचा राग आला आहे.
 
पितृ दोषावर उपाय
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्याही महिन्यात अमावस्या, पौर्णिमा, त्रयोदशी आणि चतुर्दशी तिथींना घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तूप आणि गुळाची उदबत्ती लावा. यासोबतच सकाळी उठल्याबरोबर पितरांना नमन करा. अशाने पितृ प्रसन्न होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती