पिवळ्या रंगाची वास्तू: वास्तुशास्त्रात दिशांसोबतच रंगांनाही खूप महत्त्व आहे. वास्तूनुसार घराचे बांधकाम केल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात. तर दुसरीकडे घर वास्तूनुसार नसेल तर घरातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यासोबतच पैशांच्या आवकतही अडथळा निर्माण होतो. वास्तूनुसार पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. अनेक शुभ प्रसंगी पिवळा रंग वापरला जातो. असे म्हटले जाते की पिवळा रंग घरात सकारात्मक ऊर्जा संचारतो. ज्यामुळे घरात सुख-शांती नांदते.