आपल्या घरातील दक्षिण दिशेचे क्षेत्र हे जीवनातील 'प्रसिद्धी' नामक आकांक्षेशी निगडित असते. अग्नी हे या क्षेत्राचे मूलतत्त्व आहे. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाची वस्तू अथवा लाल रंगाचे चित्र लावणे वास्तुशास्त्रात शुभ मानले आहे. असे केल्याने आपली प्रसिद्धी व प्रतिष्ठा वाढते. कारण लाल रंग अग्नी या मूलतत्त्वाचे प्रतीक आहे.
घराची फरशी व काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी मीठ मिश्रित म्हणजेच मीठ मिसळलेल्या पाण्याचा उपयोग करा. हे पाणी नकारात्मकतेला दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. मीठमिश्रित पाण्याने घरातील फरशी पुसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. घरात फरशी पुसण्यासाठी पाण्यात शुद्ध न केलेले सागरी मीठ मिसळावे. त्याद्वारे घरातील नकारात्मक प्रभाव व ऊर्जा कमी करता येते.