शारदीय नवरात्रीचा काळ फारच शुभ असतो. नवरात्रीत देवीची पूजा आराधना केल्याने वातावरण प्रसन्नचित्त जाणवत. या वेळेस देवीची पूजा करताना जर वास्तूच्या सोप्या उपायांचा विचार केला तर मनोवांछित फळांची प्राप्ती होते. तर जाणून घेऊया देवी आराधनेच्या या नऊ रात्रीत तुम्ही कशा प्रकारे वास्तू उपाय करून आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती आणू शकता.
नवरात्रीत मंदिराचा झंडा उत्तर पश्चिम दिशेत लावायला पाहिजे. देवीची प्रतिमा दक्षिणमुखी असायला पाहिजे, पण पूजा स्थळाचे नियम मंदिरापेक्षा वेगळे असतात म्हणून घरात आराधना पूर्व दिशेकडे तोंड करून करायला पाहिजे.
ज्या जागेवर देवीची आराधना होते त्या जागेच्या सजावटीचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. देवघराची सजावट करताना रंगाचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. तेथे पांढरा, हलका पिवळा, हिरवा इत्यादी हलक्या रंगाचा पेंट करायला पाहिजे. देवीची पूजा करताना लाल रंगांच्या ताज्या फुलांचा वापर करावा.