Vastu Tips For Mental Health : वास्तुच्या या छोट्या उपायांनी करा स्वतःला तणावमुक्त
गुरूवार, 24 मार्च 2022 (17:46 IST)
आजच्या धकाधकीच्या जीवनात, तणावग्रस्त व्यक्तींना भेटणे असामान्य नाही. कामाचा ताण आणि घरातील जबाबदाऱ्या एकत्र आल्यावर माणसाला त्रास होऊ शकतो ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो. तणाव वाढला की नैराश्य येते. अलीकडच्या काळात तणाव इतका वाढला आहे की त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. तणाव कोणत्याही प्रकारचा असू शकतो आणि लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकतो. नैराश्य लवकरात लवकर संपवणे अत्यंत आवश्यक आहे.
वास्तूमध्ये रंगांचे महत्त्व सांगितले आहे. वास्तूनुसार रंगांची निवड केल्यास नैराश्यातून बऱ्याच अंशी सुटका होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार रंग तणाव कमी आणि वाढवू शकतात. तुम्हालाही रंगांच्या मदतीने तणाव कमी करायचा असेल तर या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
हलका राखाडी वापर
हलका राखाडी रंग सौम्य मानला जातो जो एखाद्या व्यक्तीच्या मेंदूवर थेट परिणाम करू शकतो. या रंगाचा सुखदायक प्रभाव आहे आणि त्याच वेळी आकर्षक आहे.
जर तुम्ही तणावाखाली असाल तर तुम्ही हलके राखाडी रंगाचे कपडे घालू शकता आणि त्यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत होईल. वास्तूनुसार असे रंगीत कपडे मानसिक तणाव कमी करण्यात खूप मदत करतात. जर तुम्ही तुमच्या दिवाणखान्याच्या भिंती हलक्या राखाडी रंगात रंगवल्या तर तुम्हाला मनःशांती मिळते.
हलका गुलाबी रंग
फिकट गुलाबी रंग हा अतिशय शांत आणि सौम्य रंग मानला जातो मन शांत ठेवण्यासाठी हा रंग सर्वात प्रभावी आहे. तणावाच्या काळात हा तुम्हाला प्रिय वाटतो. हा रंग तुमच्या जीवनात संतुलन निर्मार करण्यास मदत करतो. तसेच, वास्तूनुसार तुम्ही फिकट गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा आणि तुमच्या बेडरूममध्ये हा रंग वापरण्याचा विचार करा.
लॅव्हेंडरचा वापर करा
हा रंग त्याचा नावाप्रमाणेच मस्त आहे. तणाव कमी करण्याचा विचार केल्यास, वास्तू हा रंग सर्वाधिक वापरण्याची शिफारस करतो. जर तुमचे मन तणावाकाली असेल तर तुम्ही लॅव्हेंडर रंगाचे कपडे घाला आणि हा रंग तुमच्या घराच्या भिंतींवरही वापरा. एवढच नव्हे तर तुमचे नाते ताणले असेल तर तुम्ही लॅव्हेंडर रंगीत चादरी वापरू शकता आणि यामुळे शांतता आकर्षित होईल. जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंदी रहायचे असेल तर हा सर्वोत्तम रंग आहे.
पांढरा रंग
प्रत्येकाला माहित आहे की पांढरा रंग शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे. या रंगाचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनात शांतता अनुभवू शकता. हा रंग तुमच्या मेंदूतील पेशी नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. वास्तुशास्त्रानुसार या रंगाच्या वापराने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो.
निळ्या रंगाचा वापर
निळा रंग सर्व रंगांमध्ये सर्वात सुंदर आहे आणि या रंगाचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील तणाव कायमचा दूर करू शकता. एवढेच नाही तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. तणावाखाली असताना तुम्हाला हा रंग दिसला तर लगेच तुम्हाला आराम वाटण्यास मदत होते.
हिरव्या रंगाचा वापर
हिरवा रंग निसर्ग आणि शांततेचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार हा रंग आनंद देतो आणि नैराश्य कमी करतो. जर कोणाला जास्त ताण येत असेल तर हो हिरवे कपडे घालू शकतो. जेव्हा तुम्ही काही महत्वाच्या किंवा शुभ कामासाठी बाहेर जाता तेव्हा हिरव्या रंगाचे कपडे घाला. हा रंग तणाव दूर करण्यास मदत करतो आणि तुम्हाला यशस्वी बनवतो.