घरातील शयन कक्ष एक महत्त्वाची जागा असते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या शयनकक्षात कोणत्याही प्रकाराचा दोष असल्याने घरात अशांती येते. नवरा-बायकोमध्ये वितंडवाद होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून शयनकक्ष नेहमी वास्तुनुसार असावे. चला तर मग जाणून घेऊ या की वास्तुनुसार कोणत्या दिशेला आणि कसं असावे शयनकक्ष.
* कोणत्या दिशेला असावे शयनकक्ष -
वास्तुनुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला शयनकक्ष बांधणे चांगले आहे. या शिवाय पश्चिम दिशेला देखील शयनकक्षाची बांधणी करू शकता. परंतु उत्तर-पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला शयनकक्ष बांधू नये.
* पलंगाचा आकार -
पलंग अनेक आकारात येतात जसे की चौरस,अंडाकृती,वर्तुळ,आयताकृती .वास्तुनुसार शयनकक्षात नेहमी चौरस किंवा आयताकृती पलंग असावा.वर्तुळाकार पलंग नसावा. पलंगाच्या खाली कधीही चपला बूट काढू नये किंवा इतर सामान देखील ठेवू नये.