घरात एक्वेरियम ठेवण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या

मंगळवार, 12 जानेवारी 2021 (22:47 IST)
लोक घरात अनेक प्रकारचे पाळीव प्राणी पाळतात. असं आवश्यक नाही की पाळीव म्हणून आपण कुत्रे किंवा मांजरच पाळावे. बऱ्याच बायकांना घरात एक्वेरियम ठेवणे आवडते. आपल्या डोळ्या समोर मासे पाण्यात खेळताना चांगले वाटते. एवढेच नव्हे तर घरात एक्वेरियम ठेवल्यानं घराचे सौंदर्य खुलते. बऱ्याच बायकांना घरात एक्वेरियम ठेवताना मनात शंका असतात. म्हणून त्यांना कळत नाही की घरात एक्वेरियम ठेवावे किंवा नाही. घरात एक्वेरियम ठेवल्यावर त्यांची योग्यरित्या काळजी कशी घ्यावी. जर आपल्या मनात देखील असे काही विचार आहे तर आम्ही सांगत आहोत या गोष्टीं बदद्ल. चला तर मग जाणून घेऊ या .
 
* फिश टॅंक ची देखभाल करणे महागडे आहे-
हे खरे आहे की एक्वेरियम जेवढे मोठे असेल त्याची निगा राखणे देखील तेवढेच सोपे असते. ताज्या पाण्याच्या टाक्यातीळ मासे राखणे सोपे असते. ताज्या पाण्यात टाक्याच्या जो खर्च होतो तो आहे फिश फूड,फिल्टरेशन आणि पुरेसा प्रकाश. या सर्वांमध्ये फार कमी खर्च येतो. 
 
* टॅंक मधून पाणी बदलावे लागते -
 महिलांचा असा विश्वास आहे की जर त्या एक्वेरियम ठेवतात तर त्यांना टाकीचे पाणी दररोज बदलावे लागणार पण खरं तर असं आहे की जर आपण दररोज टाकीचे पाणी बदलता तर या मुळे आपले मासे मरू देखील शकतात, एवढेच नव्हे तर आपल्याला टाकीचे पाणी दररोज पूर्ण बदलायचे नाही तर आपल्याला टाकीचे पाणी दर आठवड्यात दहा ते वीस टक्केच बदलायचे आहे. हे माहित नसेल की पाण्यातील जिवाणू माशांना जिवंत राहण्यास मदत करतात. पाणी पूर्ण पणे बदलणे हे हानिकारक होऊ शकत.
 
* निसर्गाला नुकसान करणं-
काही बायका विचार करतात की जर त्या घरात एक्वेरियम ठेवतात तर या मुळे त्या नैसर्गिक वातावरणाला हानी पोहोचवत आहे तर असं काही नाही. दुकानात विकल्या जाणाऱ्या मासे तिथेच उत्पन्न करतात. हे मासे नैसर्गिक वातावरणात जगू शकत नाही आणि मासे पुन्हा तलावात सोडल्याने पर्यावरणास हानी होऊ शकते.हे मासे एका नैसर्गिक वातावरणात जगू शकत नाही.
 
* सुरुवातीला लहान टॅंक निवडा -
हे देखील खरे नाही. काही बायका विचार करतात की त्या नवशिक्या आहे म्हणून लहान टाकीचे एक्वेरियम निवडावे. जर आपण एक छंद म्हणून हे सुरू करत आहात तर लहान टॅंक किंवा टाकी निवडू नये. ह्या टॅन्कची निगा राखणे कठीण असते. मोठ्या टँकची राखण करणे सोपे असते या मध्ये माशांच्या मृत्यूचे प्रमाण देखील कमी होतील. सोनेरी मासे फिश पात्रा मध्ये ठेवणे वाईट कल्पना आहे लहान पात्रात माशांना फिरायला जागा कमी असते त्यामुळे त्या सहज मरतात. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती