घर सजवताना हे रंग वापरा, सुंदरतेसह शांती अनुभवाल

गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (09:50 IST)
सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. दिवाळी काहीच दिवसांवर येऊन टिपली आहे. त्या पूर्वी लोकं आपापल्या घराची स्वच्छता करतात, रंग देतात आणि आपल्या घराला नीट नेटकं रचतात. पण यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळे सण घरातल्या घरातच साजरे केले जात आहे. या मागील कारण म्हणजे असे की कोरोना साथीचा रोग असल्यामुळे त्याचे संसर्ग झपाट्याने वाढते. म्हणून यंदाच्या वर्षी हा सण देखील थोडक्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. 
 
दिवाळी येण्यापूर्वी घराची रंग रंगोटी करवतात. जर आपण देखील घराचा साज-सज्जा करत असाल तर दिशांच्या अनुरूप समृद्धी देणारे हे 5 रंग निवडा आणि वर्ष भर आनंद आणि समृद्धी मिळवा. जाणून घेऊ या रंगाची निवड कशी करायची ते.
 
हिंदू धर्मातील साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. या साठी पूर्वी पासूनच तयारी सुरू करण्यात येते. बऱ्याच दिवसापूर्वी पासून घराची स्वच्छतेचे काम सुरू होते. घरात सुख शांती आणि आनंदाचे वातावरण राहण्यासाठी बरेच लोकं आपल्या घराचा स्वच्छतेसाठी आणि घराला रंग देण्यासाठी वास्तू आणि फेंगशुईचे टिप्स अवलंबवतात. 
 
आपण देखील आपल्या सौभाग्याचा वृद्धीसाठी घराला रंग देताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा.
 
1 घराची बैठकीतली खोली सर्वात महत्त्वाची आहे, म्हणून या खोलीच्या भिंतींवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. या खोलीच्या भिंतीवर तपकिरी, गुलाबी, पांढरा किंवा क्रीम रंग देणं चांगलं मानतात. या खोलीत आपण या रंगाचे पडदे किंवा उशीच्या खोळी वापरणे देखील शुभ असतं.
 
2 जेवणाची खोली रंगवताना आकाशी किंवा फिकट हिरवा आणि गुलाबी रंग करू शकता. हे रंग नेहमी ऊर्जा आणि ताजेपणा आणि सकारात्मकतेचा संचार करतात.
 
3 स्वयंपाकघरात पांढरा रंग देणं नेहमीच चांगले मानले जाते. जरी हे घाण देखील लवकर होतं, पण जर आपण नियमितपणे स्वच्छता कराल तर हे सकारात्मक परिणाम देतात.
 
4 स्नानगृह किंवा स्वच्छतागृहासाठी फिकट गुलाबी किंवा पांढरा रंग सर्वोत्तम असतो. विशेषतः स्नानगृहात गुलाबी रंगाचा वापर ताजेपणा टिकवून ठेवतो. त्यामुळे आपल्याला आतून आनंद जाणवतो.
 
5 झोपण्याची खोली देखील खूप महत्त्वाची असते, इथे आपण फिकट हिरवा, आकाशी गुलाबी सारखे रंग वापरू शकता, जे बघून आपल्याला नेहमी आनंदी वाटणार आणि हे रंग आपले संबंध मधुर करणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती