वास्तुदोष : या कारणांमुळे घरात राहते नेमही पैशांची कमी

शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (00:08 IST)
वास्तुदोषामुळे घरात नेहमी आजारपण, तणाव आणि पैशांची कमी येते. या सर्व कारणांमुळे तुम्ही तणावात राहू लागता आणि आपल्या ध्येयाला फोकस करू शकत नाही. या कारणांमुळे परिवारातील सदस्यांना धन हानी होऊ लागते आणि घरात नकारात्मक ऊर्जा येणे सुरू होते. त्याशिवाय शास्त्रांमध्ये काही सवयींबद्दल सांगण्यात आले आहे ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची कृपा मिळत नाही. आपल्या या सवयींना सुधारून तुम्ही तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढू शकता.
 
मोठ्यांच्या अपमान करणे : जे लोक मोठ्यांचा अपमान करतात आणि त्यांच्यासोबत वाईट व्यवहार करतात त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा राहत नाही. शास्त्रांत सांगण्यात आले आहे की मोठ्यांचा मान करणार्‍यांच्या जीवनात नेमही प्रगती होते. पण जे लोक मोठ्यांसोबत चुकीचा व्यवहार करतात अशा लोकांच्या जीवनात नेहमी अडचण येते.
 
किचन अस्वच्छ ठेवणे : ज्या लोकांचे किचन अस्वच्छ राहत त्यांच्या पत्रिकेत ग्रह दोष असतो. म्हणून असे म्हटले जाते की किचनला स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि रात्री खरकटे भांडे नाही ठेवायला पाहिजे. याने घरात बरकत येते.
 
बेडवर घाण चादर आणि अव्यवस्थित बिस्तर : जर घरातील बेड नेमही अव्यवस्थित असतो आणि चादर घाण असते तर असे म्हटले जाते की घरात वास्तू दोष आहे. यामुळे घरात नेहमी तणाव असतो तसेच घरात बरकत देखील राहत नाही.
 
अस्ताव्यस्त जोडे चपला : जोड्यांना घरात कुठेही नाही फेकायला पाहिजे. तसेच बाहेरच्या जोड्यांना घरात नाही घालायला पाहिजे. घरात घालण्यासाठी वेगळे जोडे चपला असायला पाहिजे. असे म्हटले जाते की बाहेरचे जोडे घरात घातल्याने वास्तुदोष येतो. त्याशिवाय घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि घरात पैशांची चणचण होऊ लागते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती