वास्तुनुसार दक्षिण दिशा प्रगतीची

सोमवार, 14 जानेवारी 2019 (15:55 IST)
मानवाप्रमाणे वास्तुलाही पाच ज्ञानेंद्रिये असतात. उदा. हवा, वातावरण, जल, भूमी आणि वृक्ष. त्यांच्या संतुलनावरच वास्तु शुभ की अशुभ हे ठऱते. वास्तुमध्ये दरवाजे, खिडक्या, बेडरूम, दिवाणखाना व किचन हे योग्य दिशांना नसतील तर अनके अडचणी उत्पन्न होतात. 
 
पण अनेकदा या सगळ्यांचा बागुलबुवा केला जातो. म्हणून वास्तुशास्त्रासंदर्भातील काही बाबींसंदर्भात स्पष्टीकरण महित असणे आवश्यक आहे. यात सगळ्यांना माहित असलेली बाब म्हणजे दक्षिण दिशेला असलेले घर. अशा पद्धतीचे घर अशुभ मानले जाते. त्यामुळे लोक या दिशेला असलेले घर घेण्यास नकार देतात. त्याची विक्रीही अनेकदा कठीण होऊन बसते. 
 
पण हा शुद्ध गैरसमज आहे. भारतातील अनेक शहरांचा इतिहास लक्षात घेतला तर दक्षिण दिशा ही प्रगतीची असल्याचे लक्षात येईल. इतर दिशाही तेवढ्या प्रगतीशील नाहीत. संपन्नता दक्षिण दिशेकडूनच मिळते. रावणाची लंका व भारताचा सुवर्णसाठा ही त्याची उदाहरणे. 
 
घरासंदर्भातील काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. उदा. ईशान्येला शौचालय नको. त्यामुळे कष्ट वाढतात. स्वयंपाक घर आग्नेय दिशेला हवे. 
 
बेडरूम नैऋत्य दिशेला हवी. खिडक्या उत्तर वा पूर्व दिशेलाच हव्यात. दरवाज्यांसाठी पूर्व किंवा उत्तर दिशाच उत्तम मानली गेली आहे. घर महिलेच्या नावावर असेल तर या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला हवा. त्याचवेळी तिजोरीचा दरवाजाही दक्षिण दिशेला असल्यास उत्तम.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती