Vastu Tips : घरात गंगा जल असेल तर करू नये हे काम!

सोमवार, 23 जुलै 2018 (08:39 IST)
हिंदू धर्मात गंगाजलाचे फार महत्त्व आहे आणि यामुळेच लोक आपल्या घरात हे पवित्र जल ठेवतात. प्रत्येक शुभ कार्यात गंगाजलाचा प्रयोग केला जातो. घरात एखाद्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक कामात याचा वापर करण्यात येतो. गंगाजलाबद्दल लोक बरीच सावधगिरी वापरतात, पण तरीही नकळत अशा काही चुका होतात ज्यानंतर फार मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घ्या लोक नकळत कुठल्या चुका करून बसतात.  
 
जास्तकरून लोक गंगाजलाला प्लास्टिकच्या बाटलीत किंवा असेच एखाद्या पात्रात ठेवतात, ज्याला अशुभ मानले जाते. गंगाजलाला नेहमी तांबा, चांदी किंवा इतर एखाद्या धातूने तयार भांड्यात ठेवायला पाहिजे.  
 
घरातील सर्वात पवित्र जागेवर गंगाजल ठेवायला पाहिजे आणि वेळे वेळेवर त्या जागेची स्वच्छता करायला पाहिजे. तुम्ही ज्या खोलीत गंगा जल ठेवले आहे तेथे कधीही मांस किंवा दारूचे सेवन काही करावे.  
 
गंगा जल असो किंवा कुठल्याही पवित्र नदीचे जल, त्याला नेहमी ईशान्य कोपर्‍यात ठेवायला पाहिजे.  
 
गंगा जल ला कधीपण घाण आणि उष्ट्या हाताने शिवायला नको.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती