ओट्यावर कोणते ही कपाट किंवा आलमारी ठेऊ नका, कारण त्यामुळे अकल्पित परिस्थिती उत्पन्न होण्याची भिती निर्माण होऊ शकेल.
स्वयंपाकघरात विरूद्ध दिशेला दोन खिडक्या असाव्यात, ज्यात क्रॉस वेंटीलेशनची सोय असेल. जर स्वैपाकघरात फ्रिज ठेवले असेल तर त्यास वायव्येकडच्या कोपर्यात ठेवा.
स्वयंपाकघरात ओटा पूर्व किंवा उत्तरेकडच्या भिंतीला स्पर्श करणारा नसावा परंतु दक्षिण किंवा पश्चिम भिंतीत चिटकलेला असावा.
स्वयंपाकघरात एग्जास्ट फॅन ईशान्येकडील कोपर्याच्या दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे लावला जाऊ शकतो.
पाकघर आणि भोजनगृह एकाच खोलीत असल्यास डायनिंग टेबलाला स्वैपाकघराच्या पश्चिमेकडे ठेवले पाहिजे. कचर्याची पेटी किंवा कचरा स्वयंपाकघरात ठेऊ नये, त्यामुळे कुटुंबातील लोकांच्या अरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
स्वयंपाकघराच्या भिंतीवर पांढरा किंवा निळा रंग असावा. सिंक ओट्याच्या डाव्या बाजूस आणि गॅस (कुकिंग रेंज) ओट्याच्या उजव्या बाजूस असावा.