वास्तूप्रमाणे घरातील 'फूट स्टेप्स' अशा असाव्यात

गुरूवार, 24 मे 2018 (14:51 IST)
आपण सुंदर घर पाहिले असेल. त्या घराच्या बाहेर लॉन असेल, परंतु, त्या लॉनवरून घरात येणारा रस्ता (फूट स्टेप्स) पाहिल्या का ? लॉनवर 'फूट स्टेप्स' तयार करणारी मंडळी खूप कमी असतात. फूट स्टेप तयार करण्याचे दोन फायदे असतात. त्यातील पहिला म्हणजे येणार्‍या- जाणार्‍याचे पाय लॉनवर पडत नाही व लॉनचे गवत दाबले जात नाही. तर दुसरा म्हणजे, मंदिरात जाण्याचा आभास होतो. आम्ही आपल्याला काही टिप्स देणार आहेत. त्यात तुमच्याकडे असलेल्या काही नवीन कल्पनांनी घरात येणारा रस्ता अधिक सुंदर करू शकतात. 
 
* सगळ्यात आधी हे निश्चित करा की, बगिचाच्या कुठल्या दिशेला फूट स्टेप्स तयार करायच्या आहेत. 
 
* फूट स्टेप्सचा आकार कसा असला पाहिजे यावर विचार करा व गोल, चौरस, आयताकृती आदी आकार तयार करू शकता. 
 
* फरशीला त्या आकारात कारागिराकडून तयार करून लॉनवर सरळ अथवा नागमोडी आकारात लावू शकतात. 
 
* या सुंदर नागमोडी रस्त्याला अधिक सुंदर करण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर टेराकोटा शो पीस ठेवा. 
 
* घरात येणारा मार्ग अधिक सुंदर करण्यासाठी लँड लॅम्प देखील ठिकठिकाणी लावू शकतात. रात्री घरात येणारा मार्ग विद्युत रोशणाईत न्हाऊन निघतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती