Vastu Tips अशा प्रकारे ठेवा मौल्यवान वस्तू

बुधवार, 22 मार्च 2023 (15:32 IST)
सर्वांकडे संपत्ती, पैसा असला तरी त्यात वाढ व्हावी अशी सर्वांची इच्छा असते. वाढ शक्य आहे परंतू घरात असलेले धन आधी योग्य प्रकारे ठेवले तर सर्व शक्य आहे. तर आज जाणून घ्या की आपली संपत्ती आणि मौल्यवान वस्तू, दागिने कशा प्रकारे ठेवावे ज्याने त्यात 4 पटीने वाढ होऊ शकते.
 
* पूर्व दिशा - घराची संपत्ती आणि तिजोरी येथे ठेवणे खूपच शुभ ठरतं. 
 
* पश्चिम दिशा - येथे संपत्ती व दागिने ठेवल्याने घरातील मुख्य माणसाला पैसा कमावण्यासाठी खूप परिश्रम करावं लागतं.
 
* उत्तर दिशा - पैसे आणि दागिने ठेवत असलेले कपाट, उत्तर दिशेला असलेल्या खोलीच्या दक्षिणेच्या भिंतीशी असावे. अशाने कपाट उत्तर दिशेकडे उघडेल आणि त्यात ठेवलेल्या धनात वाढ होत राहील.
 
* दक्षिण दिशा - या दिशेने संपत्ती, सोने, चांदी आणि दागिने ठेवल्याने काही नुकसान होते नाही, परंतु वाढ देखील होत नाही.
 
* पायर्‍यांखाली तिजोरी ठेवणे अशुभ असतं. शौचालयाच्या समोर देखील तिजोरी ठेवू नये. तिजोरी असलेल्या खोलीत स्वच्छता असावी.
 
* घराच्या तिजोरीवर बसलेल्या लक्ष्मीचे चित्र, ज्यात दोन हत्ती सोंड उचलून उभे असतात, असे चित्र ठेवणे शुभ मानले गेले आहे.
 
* तिजोरी असलेल्या खोलीचा रंग क्रीम किंवा ऑफ पांढरा असावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती