या दिवशी चुकूनही वाहन खरेदी करू नका

शनिवार, 18 मे 2024 (06:31 IST)
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे वाहन आहे. पण जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल. ते खरेदी करताना आम्ही नेहमी त्याच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष देतो. पण यासोबतच वास्तूचे काही नियम पाळले पाहिजेत. नियमानुसार वाहन घेऊन आमचा प्रवास चांगला होतो.
 
वाहन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
वाहनाचा रंग- वाहन खरेदी करताना त्याच्या रंगाचा विचार करावा. पांढरे, चांदी आणि इतर हलके रंग सामान्यतः वाहनांसाठी शुभ मानले जातात, कारण ते सकारात्मकता आणि शुद्धतेशी संबंधित आहेत. याशिवाय जर तुमच्या राशीमध्ये शुभ असेल असा दुसरा रंग असेल तर तुम्ही त्या रंगाचे वाहन देखील खरेदी करू शकता.
 
या दिवशी वाहन खरेदी करू नका- नवीन वाहन खरेदी करणार असाल तर तो दिवस शुभ असावा याची काळजी घ्यावी. पौर्णिमा तिथी किंवा त्याच्या आसपासच्या दिवशी वाहन घेणे तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त वर्षाभरात येत असलेले शुभ दिवस जसे गुढीपाडवा, नवरात्र, धनत्रयोदशी, अक्षय तृतीया, आणि इतर शुभ दिवस देखील वाहन खरेदी करता येऊ शकतात. मात्र चुकूनही अमावस्या आणि शनिवारी वाहन घेऊ नका.
 
सैंधव मीठ- जर तुमचे वाहन वारंवार बिघडत असेल किंवा त्यात आणखी काही समस्या असेल. तर आपल्या वाहनाच्या सीटखाली वर्तमानपत्रात किंवा कापडात सैंधव मीठ बांधून ठेवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
 
वाहन स्वच्छ ठेवा- ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले पाहिजे जेणेकरून घरात समृद्धी येईल. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे वाहनही स्वच्छ ठेवावे, यामुळे ते जास्त काळ टिकेल आणि त्यात काही नकारात्मकता असेल तर ती साफसफाई करताना निघून जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती