स्वप्न शास्त्रात या स्वप्नांना अशुभ मानतात, जाणून घ्या परिणाम

सोमवार, 28 डिसेंबर 2020 (09:14 IST)
स्वप्न शास्त्रात स्वप्नांच्या बाबतीत माहिती मिळते. स्वप्न हे भविष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घडणाऱ्या घटनांना दर्शवतात. असे म्हटले जाते की स्वप्न शास्त्राच्याद्वारे स्वप्नांचे अर्थ समजले जाऊ शकतात आणि हे शोधले जाऊ शकते की या स्वप्नांचे फळ भविष्या मध्ये कश्या प्रकारे मिळणार आहे. असे म्हणतात की स्वप्न शास्त्रात उत्तम ज्ञानी सुद्धा स्वप्नाचे युक्तिवाद नाकारत नाही. जाणून घेऊ या अशा काही स्वप्नांबद्दल ज्यांना स्वप्न शास्त्रात अशुभ सांगितले आहे.

1 ज्या प्रकारे काळी मांजर आडवी येणं अशुभ मानले जातात. तसेच काळी मांजर स्वप्नात बघणे देखील अशुभ आहे.या मुळे अशुभ फळांची प्राप्ती होते. स्वप्नशास्त्रांनुसार या स्वप्नांचा परिणाम माणसाच्या मानसिक स्थिती वर पडतो. असा विश्वास आहे की या स्वप्नांच्या प्रभावाला कमी करण्यासाठी भगवान शंकराची उपासना केली पाहिजे.
 
2 असे म्हणतात की स्वप्नात माणसाने कपड्यांवर पिवळे डाग बघणे अशुभ आहे. या स्वप्नांचा दुष्प्रभाव माणसाच्या आर्थिक स्थिती वर पडतो. या स्वप्नांच्या परिणामाला कमी करण्यासाठी आई लक्ष्मीला लाल कपडे अर्पण करावे.
 
3 दारावर कडी लावलेली बघणे अशुभ असते या मुळे माणसाला करिअर मध्ये अशुभ फळांची प्राप्ती होते. असे म्हणतात की स्वप्नांचा परिणाम माणसाच्या कार्यक्षेत्रावर नकारात्मक पडतो. या स्वप्नांचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी हनुमानाला लाल शेंदूर अर्पण करण्याची मान्यता आहे.

4 प्राण्यांचा कळप - स्वप्नात प्राण्यांचा कळप दिसल्याने अशुभ फळाची प्राप्ती होते. असे म्हणतात की हे स्वप्न माणसाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. या स्वप्नांचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी लाल कापड दान करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती