वास्तूत घराच्या चारही बाजूला व्हरांडा चालतो का?

घराच्या चारही बाजूनं व्हरांडा ठेवता येतो. अशा व्हरांड्याला सुस्थित असं म्हणतात.

घराच्या समोर असणारा व्हरांडा पागोट्याप्रमाणं असतो. पागोटा जसं डोक्याचं रक्षण करतो तसा हा व्हरांडा घराचं रक्षण करतो. सुखसमृद्धी देतो. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या व्हरांड्याला सायाश्रय अर्थात सायंकाळची सावली असं म्हणतात. तर डाव्या व उजव्या बाजूला असलेल्या व्हरांड्याला शवस्तंभ म्हणतात. घराच्या समोर व्हरांडा असेल तरच मागे किंवा अन्यत्र व्हरांडा ठेवावा. घराच्या समोर व्हरांडा न ठेवता मागे किंवा डाव्या व उजव्या बाजूला ठेवल्यास अपमृत्यू आणि आर्थिक हानी अशी फळं मिळतात.

वेबदुनिया वर वाचा