ऑफिसमध्ये वॉशरूम कोणत्या दिशेत असावे

बुधवार, 24 फेब्रुवारी 2016 (13:47 IST)
'वॉश रूम', 'वॉश रूम कारखान्याच्या ईशान्येस, आग्नेयकडे आणि नैऋत्येच्या कोपर्‍यात कालत्रयी नसावे. 
 
वॉश रूमच्या किंवा टॉयलेटच्या भिंतींना हिरवा, निळा किंवा पिवळा रंग असलेला बरा. 
 
वॉश रूमचे नळ पूर्वेस, उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेत असावे. 
 
सेप्टिक टॅक मध्यपूर्वेस किंवा उत्तरेकडे असावा, परंतु दक्षिणेस किंवा पश्चिमेकडे कालत्रयी नसावा. 
 
वॉश रूम किंवा टॉयलेटमध्ये वॉश बेसिन पश्चिमेकडे असावे.
 
वाहणारे पाणी पूर्वेकडे, उत्तरेस किंवा ईशान्य दिशेस वाहील अशा प्रकारे वॉश रूमच्या तळभागाचा उतार असावा. 
 
वॉश रूमशी निगडीत सांडपाण्याचे पाइप, कारखान्याच्या उत्तरेस किंवा पूर्वेकडच्या भागात असावेत. 

वेबदुनिया वर वाचा