कलिंगडाच्या सालीपासून बनवा शिरा, सोपी कृती

बुधवार, 10 जून 2020 (13:33 IST)
साहित्य : कलिंगडाची सालं, 2 चमचे हरभराच्या डाळीचे पीठ, साजूक तूप, 2 वाटी साखर, दीड कप दूध, वेलची पूड, सुखे मेवे, दूध मसाला.
 
कृती : कलिंगडाच्या सालीची हिरवी बाजू पूर्ण काढून घ्यायची. पांढऱ्या भागाला किसून घ्या नाही तर मिक्सर मध्ये देखील वाटू शकता. कढईत साजूक तूप घाला. 2 चमचे हरभराच्या डाळीचे पीठ घाला. आता या मिश्रणाला कढईत घालून चांगले खरपूस भाजून घ्या. त्यामधील पाणी आटवून घ्यायचे आहे. तांबूस रंग आल्यावर दीड कप दूध सायी सकट घाला. त्याला चांगले शिजवून घ्या.

आता त्यामध्ये दुधाचा मसाला घाला. 2 वाट्या साखर घाला, वेलचीची पूड घाला. त्याला चांगले परतून घ्या त्यामधील पाणी आटेपर्यंत परतून घ्या. पाणी आटल्यावर त्यात थोडे मेवे घाला आणि सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती