साहित्य-
500 ग्रॅम तिळ, 250 ग्रॅम शेंगदाणे, 25 ग्रॅम चण्याची डाळ, 500 ग्रॅम गूळ, 1 टी स्पून वेलची पूड, 1 चमचा साजूक तूप
कृती-
सर्व प्रथम कढईत तिळ आणि शेंगदाणे वेगवेगळे भाजून घ्यावे. नंतर ते एका ताटात काढून घ्यावे. त्यानंतर कढईत एक चमचा तूप टाकून त्यात गूळ बारीक करून टाका. तसेच गूळ पूर्ण वितळून घ्यावा. बोटाला गूळ चिकटतो आहे का हे पहा आणि मग नंतर शेंगदाणे, तिळ, वेलची पूड, भाजून घेतलेली चण्याची डाळ अदि हे सर्व मिश्रण टाकून हलवून घ्यावे.