80 ग्रॅम तांदूळ 2 तास पाण्यात भिजवलेले
3/4 कप किंवा 150 ग्रॅम गूळ
कृती-
सर्वात आधी 1 लिटर दूध उकळण्यासाठी ठेवावे. आता दुधात भिजवलेले तांदूळ घालावे. तांदूळ दुधात मऊ होईपर्यंत शिजवा. तसेच दूध पातेलीच्या तळाशी बसणार नाही म्हणून ढवळत राहावे. आता दुसऱ्या पातेलीत अर्धी वाटी पाणी टाका आणि त्यात गूळ टाका व गूळ वितळून घ्या. दुधात तांदूळ पूर्ण शिजल्यावर त्यात बदाम, काजू आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
आता गॅस बंद करावा. खीर थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा. यामध्ये गूळ घालून चांगले मिक्स करावे. गरम खीरमध्ये गूळ घालू नका, असे केल्याने दूध फाटू शकते. आता खीर भांड्यांमध्ये काढून घ्यावी. व यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.