होळी विशेष रेसिपी नारळाची खीर

शुक्रवार, 26 मार्च 2021 (18:41 IST)
साहित्य-
1 लीटर दूध, 1/2 कच्च नारळ,1/2 चमचा वेलची पूड,1/2 कप साखर,2 चमचे काजू,2 चमचे किशमिश,2 चमचे बदाम.
 
कृती -
सर्वप्रथम कच्च नारळ किसून एका पात्रात ठेवा.दूध तापवायला मध्यम गॅस वर ठेवा.दूध उकळून झाल्यावर किसलेले नारळ मिसळा आणि साखर मिसळा घट्ट होई पर्यंत ढवळत राहा. दूध घट्ट झाल्यावर काजू,किशमिश आणि वेलचीपूड,मिसळून ढवळा,वरून बदामाचे तुकडे घालून खीर खाण्यासाठी सर्व्ह करा.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती