कृती-
सर्वात आधी एका भांड्यात ८० मिली दूध आणि २५ ग्रॅम कस्टर्ड पावडर घाला आणि चांगले मिसळा. नंतर ते एका बाजूला ठेवा.आता पॅनमध्ये एक लिटर दूध घाला आणि ते गरम करा. नंतर त्यात तयार केलेले कस्टर्ड मिक्सर घाला, ढवळून मंद आचेवर ते घट्ट होईपर्यंत शिजवा. तसेच साखर आणि वेलचीचे दाणे घाला चांगले मिसळा आणि १ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता तयार कस्टर्ड एका बाऊलमध्ये काढा व त्यात गुलाब जामून घाला. तर चला तयार आहे आपली गुलाब जामुन कस्टर्ड रेसिपी, थंडगार नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.