कृती-
सर्वात आधी एका कढईत मंद आचेवर सुके खोबरे हलके गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. यामुळे खोबऱ्याचा सुगंध येईल. भाजलेले खोबरे एका बाजूला थंड होण्यासाठी ठेवा. त्याच कढईत अर्धा चमचा तूप गरम करा. त्यात काजू, बदाम आणि बेदाणे हलकेसे परतून घ्या. परतलेला सुकामेवा थंड होण्यासाठी बाजूला काढा.खसखस सुद्धा हलकीशी भाजून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झालेल्या खोबऱ्यात पिठी साखर परतलेला सुकामेवा, वेलची पावडर आणि खसखस घाला. सर्व साहित्य एकत्र चांगले मिसळा. मिश्रण नीट एकजीव झाल्यावर तयार खिरापत बाऊलमध्ये काढा. व नैवेद्यात ठेऊन सर्वांना प्रसाद स्वरूपात द्या.