शहाळ्याचे आइस्क्रीम

सोमवार, 19 मे 2014 (15:17 IST)
साहित्य : अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, एक वाटी शहाळ्याची मलई, सजावटीसाठी स्ट्रॉबेरी.

कृती : प्रथम दूध उकळत ठेवावे. त्यात साखर घालून उकळून थंड करून ठेवावे. शहाळ्याची मलई गार झालेल्या दुधात घालावी. मिक्सरमधून फिरवावे. नंतर फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावे. सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीने सजवावे.  

वेबदुनिया वर वाचा