पुरण पोळी (व्हिडिओ पहा)

साहित्य: एक वाटी चण्याची डाळ, सव्वा पट साखर, थोडंसं गूळ, गव्हाची कणीक, मैदा, वेलची पूड, साजूक तूप.
 
कृती: चण्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. कुकरमध्ये 3-4 शिट्या घेऊन शिजवून घ्या. डाळ शिजल्यावर ती वाटून त्यात साखर, गूळ, घाला. गॅसवर चढवून मिश्रण मध्यम आचेवर आटवावे. मिश्रण ढवळत राहा. वेलची पूड घालावी. मिश्रण घट्टसर झाले की गॅसवरून उतरवा. गार होऊ द्या.
 
समान प्रमाणात मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात तेलाचे मोहन घाला आणि सैलसर मळून घ्या. पीठ मुरू द्या. नंतर पिठाची पातळसर पारी बनवून त्यात पुरणाचा गोळा भरा. सर्व बाजूने बंद करून पोळपाटावर थोडा मैदा भुरभुरून हलक्या हाताने लाटून घ्या. तव्यावर तुपाने खरपूस भाजून घ्या. सर्व्ह करताना वरून साजुक तूप घाला.

वेबदुनिया वर वाचा