उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

गुरूवार, 16 मे 2024 (08:00 IST)
उन्हाळ्याचे दिवस सर्वानाच कठीण जातात. लोक उष्णतेने त्रस्त होऊन जातात. या वातावरणात वाढते तापमान अनेक आजारांना आमंत्रण देते आहे. जर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तर डिहाईड्रेशनचा धोका वाढतो. तसेच उन्हाची झळ देखील लागू शकते. उन्हाळ्यात समस्या तेव्हा वाढते जेव्हा घाम येणे बंद होतो. घाम आला नाही तर उन्हाची झळ लागते. व ताप येऊ शकतो. 
 
घाम आला नाही तर स्नायूंची प्रोटीन डीनॅचूरेट होते ज्यामुळे थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, किडनी खराब होणे, यांसारख्या समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यामध्ये घाम येणे गरजेचे असते तसेच शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण असल्यास शरीर हाइड्रेड राहते. 
 
उन्हाळयात आपले शरीर हाइड्रेड ठेवावे. याकरिता पाणी जास्त प्यावे. भरपूर फळ, भाज्या खाव्या, लिंबू पाणी प्यावे. 
 
1, उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा, तसेच हिरव्या भाज्या, फळे सेवन करावे. पाण्याने परिपूर्ण असलेले फळे शरीराला हाइड्रेड ठेवण्यास मदत करतात.   
 
2. टरबूज, खरबूज, लिची, डाळींब, काकडी यांसारखे फळे सेवन करावे. 
 
3. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी कॉटनचे कपडे घालावे. ज्यामुळे तुमचे शरीर थंड राहील. 
 
4. उन्हाळ्यात अल्कोहोल सेवन करणे टाळावे. अल्कोहोलने शरीरात डिहाइड्रेशनचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती