नारळाची खीर

साहित्य: 1 नारळ, 1 लीटर फुल क्रीम दूध, ½ वाटी साखर, केसर (दुधात भिजवलेली), बदाम, पिस्ता, वेलची पावडर, 1 चमचा तूप
कृती: नारळ फोडून पाणी काढून घ्या. नारळ किसून वेगळं ठेवा. दूध आटवून घ्या. एका कढईत तूप गरम करून नारळाचा किस भाजून घ्या. आटवलेल्या दुधात टाकून उकळी घ्या. साखर टाकून उकळी घ्या. ड्राय फ्रूट्स, केसर, वेलची टाकून गॅस बंद करा. आवडीप्रमाणे गरम किंवा गार सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा