तिळाच्या वड्या

ND
साहित्य : २ वाट्या भाजलेल्या तीळाचे कुट, एक वाटी दाण्याचे कूट, दीड वाटी किसलेला गुळ, एक चमचा वेलदोडा पूड, अर्धी वाटी बारीक किसलेले खोबरे.

कृती : सर्वप्रथम कढईत गुळाचा कच्चा पाक तयार करावा. म्हणजे किसलेला गूळ ओला होईल. त्यानंतर गूळ पातळ होईल इतकेच पाणी घालून तिळाचे आणि दाण्याचे कूट घालून गॅस बंद करून ढवळावे. त्यात वेलदोडा पूड घालावी. गोळा घट्ट झाला की तूप लावलेल्या थाळीत जाडसर थापावी. गरम असतांनाच त्यावर बारीक किसलेले खोबरे पेरावे. गार झाल्यावर सुरीने चौकोनी मध्यम आकाराच्या वड्या कापाव्यात.

वेबदुनिया वर वाचा