बाजरीचे दिवे

साहित्य : बाजरीचे पीठ २ वाट्या, एक चमचा तीळ, चवीनुसार मीठ, साजूक तूप २ चमचे, गूळ १/४ वाटी, दूध एक वाटी, वेलची अर्धा चमचे, केशर २ काड्या.

कृती : बाजरीच्या पीठात चवीला मीठ घालून पाण्याने पीठ घट्टसर तीळ घालून भिजवावे. पिठाचे लहान लहान आकाराचे दिवे करावे. चाळणीला अथवा डब्याला तुपाचे बोट लावून दिवे चांगले वाफवून घ्यावे. शिटी काढून प्रेशरकुक करावे. एक वाटी दुधात आपल्या चवीनुसार गूळ विरघळून घ्यावा व त्यामध्ये केशर व वेलचीपूड घालावी. तयार दूध जरा कोमट करून गरमगरम दिवे याच्याबरोबर खावे.

वेबदुनिया वर वाचा