पसारा काही कमी होत नाही...!

सोमवार, 27 डिसेंबर 2021 (11:42 IST)
किती आवरलं, किती सावरलं
काम कसे ते संपत नाही
हे ठेव, ते ठेव, हे पुस, ते पुस
दिवस कसा जातो कळत नाही
पसारा काही कमी होत नाही...!
 
याला देऊ, त्याला देऊ
हे आवडलं, ते आवडलं
उगीच आपलं जमवून ठेवलं
कधी द्यायचं कळत नाही
पसारा काही कमी होत नाही...!
 
किती कपडे, किती वस्तू
यानं दिलं, त्यानं दिलं
फुटक्यात ही मन अडकलं
कसं टाकावं कळत नाही
पसारा काही कमी होत नाही...!
 
भांड्यांची ही तीच तऱ्हा
डबे, परात, पातेली, ताटल्या
प्लास्टिक च्या तर खूप बाटल्या
ठेवायला जागा पुरत नाही
पसारा काही कमी होत नाही...!
 
मनाचं ही असच असतं
नको असलेलं साचून रहातं
भूत काळाचं ओझं उतरत नाही
मनातला कचरा टाकवत नाही
पसारा काही कमी होत नाही...!
 
- सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती