नोटा बंदचा शेअर बाजारावर परिणाम

बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (13:03 IST)
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णयामुळे आज भारतातील शेअर बाजारावर विपरित परिणाम दिसून आला. तसेच सोन्याचे भावही वधारले आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज 1600 अंशांची घसरण आढळून आली असून सोन्याचा भाव 34 हजार रुपयांवर पोचला आहे. आगामी काळात सोन्याचे हे दर 38 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज व्यक्त तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तर भारतीय रुपयाचे मूल्यदेखील 23 पैशांनी घसरुन डॉलरच्या तुलनेत 66.85 रुपये प्रति डॉलरएवढे झाले आहे. 
 
शेअर बाजारात आज सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण नोंदविण्यात आली आहे. निफ्टीवर मोठ्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहे.

वेबदुनिया वर वाचा