शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला; निफ्टी 17450 च्या खाली

सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (13:41 IST)
Share Market Update :  शेअर बाजारात सकाळी झालेली घसरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दुपारी 12:15 वाजता सेन्सेक्स 1121.69 अंकांपेक्षा अधिक घसरणीसह 58,514.32 वर व्यवहार करत होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर बजाज फायनान्सला सर्वात जास्त 5.49% घसरण झाली. तर रिलायन्सचे शेअर 4.17% घसरले. नेशनल स्टॉक एक्स्चेंज ( निफ्टी) 319.25 अंकांनी घसरून 17,445.55 अंकांवर व्यवहार करत होता. 
आज शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरला. सकाळी 9:18 वाजता, 30-संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 9:18 वाजता 325.28 किंवा 0.55% घसरून 59,310.73 वर व्यापार करत होता. तर , निफ्टी 133.85 अंकांनी घसरून 17,764.80 वर व्यवहार करत होता. आज सकाळी पुन्हा पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. 
शेअर बाजारातील घसरण पुढील तासभरही कायम राहिली. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्सची घसरण 653 अंकांपर्यंत वाढली. त्यानंतर 30 संवेदी निर्देशांकासह सेन्सेक्स 58,982.06 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टीमध्येही 1 टक्क्यांची घसरण दिसून आली. पहिल्या दीड तासानंतर राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी 117.50 अंकांनी घसरून 17,587.30 अंकांवर व्यवहार करत होता.
आज सकाळी सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 3.34% घसरले. त्याचवेळी बजाज फायनान्स, एलटी, टायटन, एचडीएफसी, डॉ रेड्डी यांच्या समभागातही आज घसरण झाली. दुसरीकडे, भारती एअरटेल आज सकाळी हिरव्या चिन्हाच्या वर व्यवहार करत होता. याशिवाय इंडसइंड बँक, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर यांनीही सकारात्मक सुरुवात केली. 
     

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती