शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान बीएसई सेन्सेक्सने 900 अंकांपर्यंत झेप घेतली आणि 62,405.33 या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला. एनएसईच्या निफ्टीतही दिवसभराच्या व्यवहारात स्थिर वाढ दिसून आली. सेन्सेक्सने इतिहास रचला. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्सने सर्व जुने रेकॉर्ड तोडले आणि 62,405 अंकांवर पोहोचला, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 762.10 अंकांच्या किंवा 1.24 टक्क्यांच्या वाढीसह 62,272.68 च्या विक्रमी उच्चांकावर बंद.झाला.
बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक पुन्हा एकदा 62,000 चा टप्पा ओलांडण्यात यशस्वी ठरला. व्यवहारा दरम्यान एका क्षणी, तो 900 अंकांच्या वाढीसह 62,405.33 अंकांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. याआधी बीएसईच्या सेन्सेक्सने 62,245 ची पातळी गाठून विक्रम केला होता.
19 ऑक्टोबर 2021 रोजी या विक्रमी पातळीला स्पर्श केला. गुरुवारी आयटी समभागांमध्ये, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, पॉवर ग्रिड, एचयूएल आणि टेक महिंद्रा 2 ते 3.5 टक्क्यांनी वाढले. त्याचवेळी बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँकेचे समभाग घसरले. सेन्सेक्ससोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (NSE निफ्टी)ही जोरदार उसळी घेऊन बंद झाला.