बीएससीमध्ये सर्वात मोठी उसळी, निर्देशांक ३० हजाराच्या पुढे
मुंबई शेअर बाजार निर्देंशांकाने बुधवारी इतिहातील सर्वात मोठी उसळी घेत ३० हजाराचा टप्पा ओलांडला. बाजार बंद होताना शेअर निर्देशांक ३० हजार १३३ वर बंद झाला. तर राष्ट्रीय निर्देशांकही ९३५१वर पोहोचला.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले. त्यामुळेच निर्देशांकात वाढ झाली. शेअरमार्केटमधील १५ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले आहेत.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी देशातील बडा उद्योगसमुह असलेल्या रिलायन्स समुहाने चौथ्या तिमाहीत ८ हजार कोटींना नफा झाल्याचे जाहीर केल्यानंतर रिलायन्ससह इतर कंपन्यांचे शेअर्सही वधारले होते.