एक्झिट पोलमुळे शेअर बाजारात उत्साह

मंगळवार, 13 मे 2014 (11:48 IST)
मुंबई- 16 लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्प्यांतील मतदान पार पडले. नंतर सर्व वाहिन्यांनी एक्झिट पोलच्या निष्कर्ष दिले. बहुतांश एक्झिट पोलने नंतर देशात भाजपचे स्थिर सरकार येईल, असे संकेत दिले आहे. या अपेक्षेने शेअर बाजारात उत्साह संचारला आहे. सलग तिसर्‍या दिवशी सेन्सेक्स वधारल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आज (मंगळवार) सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला. सकाळी बाजार उघडताच सेन्सेंक्समध्ये 370 अंकांनी वाढ होऊन तो 23921वर पोहोचला. तर निफ्टीही 7116 अंशांवर पोहोचला आहे.

निफ्टी, सेंसेक्स आणि बॅंक निफ्टी नव्या उच्चांकावर बंद झाले. निफ्टीने 7000 आणि सेंसेक्सने 23500 चा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला. बॅंक निफ्टी 14091 वर बंद झाला. 

ऑईल आणि गॅस, पॉवर, ऑटो क्षेत्रातील शेअर्स तीन टक्क्यांनी वधारले. कॅपिटल गुड्स, बॅंका, एफएमसीजी, मेटल आणि कंझ्युमर ड्यूरेबल्स शेअर्समध्ये 2.75-2 टक्क्यांनी तर आयटी, रियल्टी शेअर्समध्ये 1.25-1 टक्क्यांनी वाढ दिसून आली. 

वेबदुनिया वर वाचा