30 वर्ष वयानंतर गर्भधारणा? अशी घ्या काळजी

करिअरमुळे अनेक महिला गर्भधारणेसाठी वेळ घेतात किंवा वयाच्या 30 वर्षांनंतर फॅमिली प्लानिंग सुरू करतात. सध्याच्या लाइफस्टाइलमुळे अनेक महिलांना गर्भधारणेसाठी समस्यांना तोंड द्यावं लागतं. अनेक महिला पीसीओएस, एंडोमेट्रियोसिस फायब्राँयड, ओव्हेरिअन अल्सर सारख्या समस्या झेलत असतात. अशात आपलीही वयाच्या 30 व्या वर्षानंतर गर्भधारणेची प्लानिंग असेल तर चांगल्या परिणामासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे:
 
पौष्टिक आहार
आपल्या आहारात प्रजनन क्षमता वाढवणारे पदार्थ सामील करावे. सनफ्लॉवर सीड्स आणि अवोकॅडो सारखे मोनोअनसॅचुरेटेड फॅट्ससह सीझनला भाज्या आणि फळं खावे. ओव्यूलेशनसाठी शरीराला पोषक तत्त्व गरजेचे असतात.
 
हार्मोंस संतुलन
डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन्स संतुलनासाठी योग्य औषध घ्या. आहार आणि जीवन शैलीत संतुलन ठेवत हार्मोन्सचे संतुलन ठेवा.
 
फिटनेस
नियमित व्यायाम हे अत्यंत आवश्यक आहे. रोज 30 ते 45 मिनिट शारीरिक व्यायाम आपल्याला मानसिक आणि शारीरिक रूपाने मजबुती प्रदान करेल.
 
नशा नको
धूम्रपान, अल्कोहल किंवा इतर कोणत्याही मेडिसिनची सवय असल्यास ती दूर करणे आवश्यक आहे. यात आढळणारे हानिकारक तत्त्व फर्टिलिटीवर प्रभाव टाकतात.
 
ताण टाळा
ताणपासून दूर राहा. ताण असल्यास त्याचा प्रभाव संपूर्ण एंडोक्राइन सिस्टमवर पडत असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती