Shoe Bites नवीन चपला- जोडे चावतात ? तर खास आपल्यासाठी हे टिप्स

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (16:46 IST)
नव्या चपला किंवा शूज घालण्याची मजा तेव्हा मूड खराब करुन जाते जेव्हा पायाला जखम होते किंवा खाज सुटू लागते. शू बाईट हा प्रकार सामान्य आहे. सर्वांनाच कधी ना कधी हा त्रास सहन करावा लागला असेलच. पण शू बाईटमुळे चपला किंवा शूज घालणं सोडता येत नाही म्हणून या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. जाणून घ्या काही सोपे टिप्स-
 
पायाला वारंवार चप्पल घासली गेल्याने झालेली जखम त्याला शू बाईट म्हणतात. यामुळे चप्पल घालणं अवघड होतं आणि वेदना जाणवतात. शूजचं मटेरिअल चांगलं नसल्यास किंवा आकारापेक्षा लहान आणि घट्ट चपला घातल्यामुळे शू बाईट होऊ शकतं. तर चला यावर घरगुती उपाय जाणून घ्या- 
 
बँडेड
कधीकधी नवीन शूजची समस्या अशी असते की ते एका बोटावर घट्ट असतात, विशेषत: करंगळीवर. हे तेथील त्वचा काढून टाकतं, ज्यामुळे नंतर खूप वेदना होतात. हे टाळण्यासाठी, आपण त्यावर बँडेड लावू शकता. ज्याने पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी घासलं जाणार नाही.
 
वर्तमानपत्र
नवीन असल्यामुळे जोडा जरा घट्ट असेल तर काही जाड वर्तमानपत्राचे रोल बनवून त्यात काही दिवस ठेवावे. शूज घालत नसाल तोपर्यंत हे त्यात राहू द्या ज्याने बूट जरा मोकळे होतील. एका पायात जोडा घट्ट असेल तर ही युक्ती विशेषतः फायदेशीर ठरते.
 
हेअर स्प्रे
जर पाय शूच्या आत घसरत असेल किंवा बूट किंचित सैल असेल तर ते घालण्यापूर्वी पायात काही हेअर स्प्रे घाला. याने शूज एका ठिकाणी फिक्स होण्यात मदत मिळेल.यासह, शूज घालताना खूप घाम येत असेल तर मोजे घालण्यापूर्वी पायांवर पावडर लावा. पायातून दुर्गंध येणार नाही.
 
कॉटन पॅड
टाचांचा वरचा भाग सोलल्यास येथे कॉटन पॅड किंवा लावले जाऊ शकतात. यामुळे पायातून येणारा वास आणि घाम यापासूनही सुटका मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती