योनीवरील केस काढण्यासाठी लेजर पद्धत

लेजर हेअर रिमूव्हलने आपल्या अनावश्यक केसांपासून नेहमीसाठी मुक्ती मिळू शकते. यासाठी वेदनाही सहन करण्याची गरज नसते.
 
प्‍यूबिक एरिया अर्थात जननांग वरील केसांना लेजर पद्धतीने हटवणे हल्ली प्रचलनात आहे आणि याबद्दल अधिक माहिती साठी आम्ही आपल्या मनात येत असलेल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रक्रिया
सर्वात आधी त्या भागाची शेविंग केली जाते, नंतर तिथे जेल लावले जातं आणि सकुर्लर मोशनमध्ये लेजर टाकली जाते. साधारणात सात ते आठ सत्रांनंतर तेथील 70 ते 95 टक्के केस हटवण्याचा प्रयत्न केला जातो. लेजरच्या वेगवेगळ्या तंत्राप्रमाणे सीटिंग्स बदलत असतात.
 
काळावधी
लेजर हेअर रिमूव्हलचे अनेक सेशन करावे लागते ज्याने केसांची वाढ रोखण्यात येते. या दरम्यान केसांच्या वाढीवर बंदी घातली जाते. लेजर ट्रीटमेंट घेताना मात्र 30 टक्के केस ग्रोथ करण्याच्या स्थिती राहतात. सर्व सेशन संपल्याच्या एका वर्षानंतर शेवटी टचअप करण्यात येतं.
काळजी
हा भाग खूप नाजुक असल्यामुळे काळजी घ्यावी लागते. या भागात वॅक्स केल्यास वेदना जाणवतं आणि जखम होण्याची शक्यता असते. लेजर वेदनामुक्त प्रक्रिया आहे ज्याने सोपेरित्या केस स्थायी रूपाने रिमूव्ह होतात. येथील केस काढण्यापूर्वी नम्बिंग क्रीम लावतात किंवा कूलिंग एअर दिली जाते.
 
खर्च
लेजरच्या कोणती पद्धती आणि किती सेशन घ्यावे लागतीत यावर खर्च अवलंबून असतो. भारतात 10000 रूपयांपासून याची सुरुवात होते. तसे याचे पॅकेजेसच असतात.
 
वेळ आणि फॉलो-अप
या प्रक्रियेत टॉपिकल एनेस्‍थिसिया देण्यापासून ते इतर प्रक्रियेसाठी सुमारे एक तास तरी लागतो. आणि 4 ते 8 आठवड्यात फॉलो-अप करावं लागतं.

वेदनारहित
या प्रक्रियेत वेदना होत नाही आणि शरीराला नुकसानही नाही. लेजर केसांची स्थायी रूपाने केस उगविण्याची प्रवृत्ती नष्ट करतं म्हणून याला स्थायी उपचार म्हटले आहे.
 
विशेष काळजी
ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर व्यक्तीला काही दिवस हलकं टॉपिकल स्टेरॉयड देण्यात येतं आणि त्या भागात लावण्यासाठी क्रीम दिली जाते.
 
वॅक्सीनपेक्षा अधिक प्रभावी
लेजर पद्धत बिकिनी वॅक्‍सीनच्या तुलनेत अधिक उत्तम आहे. वॅक्स किंवा शेव केल्याने केस लवकर उगवतात आणि पूर्वीपेक्षा करडे केस येतात. यात जखम होण्याचाही धोका असतो. लेजर तंत्रामध्ये कुठलीही समस्या नाही. वेदनारहित या प्रक्रियेत स्थायी समाधान मिळतं.

वेबदुनिया वर वाचा