वयाच्या पन्नासवीत ही दिसा यंग आणि फिट

वयाला हरवणार्‍या काही सोप्या उपायांमुळे आपण 50 वर्षांनंतरही फिट, यंग आणि निरोगी राहू शकता. वय वाढत असल्यामुळे काही त्रास उद्भवणे साहजिक आहे. काही पर्याय निवडून आपण आपला त्रास कमी करू शकता. जसे शॉपिंगसाठी इकडे- तिकडे भटक्यांपेक्षा ऑनलाईन शॉपिंग करा. या वयात सुंदर दिसण्याची आवडही कमी होत जाते म्हणून अनेक महिला अजागळ सारख्या राहिल्या लागतात. परंतू हा लेख केवळ त्या महिलांसाठी आहे ज्या पन्नासवीतही तिशीत असल्यासारख्या दिसू इच्छित आहे. हे काही सोपे उपाय अमलात आणून आपण या वयातही फिट आणि यंग दिसू शकता.
1. खाद्य पदार्थांनी पोषण मिळवा सप्लीमेंट्सने नव्हे: ऑर्गेनिक फ़ूड सेवन करा आणि प्रोसेस्ड फ़ूड जसे ब्रेड, पास्ता आणि चीज खाणे टाळा. 
 
2. सूप: भूक भागण्यासाठी सूप प्या. या वयात नियमित भाज्याचे सूप तयार करून पिणे सर्वोत्तम आहे. 
 
3. रात्री हलकं जेवा: रात्री जेवण्याची मात्रा कमी ठेवा. रात्री जेवल्याबरोबर झोपणे टाळा. रात्री कोणत्याही प्रकाराचे स्नेक्स घेणे टाळा.
 
4. त्वचेला आहार द्या: आपण जे काही खातात त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होतो. म्हणून पोषक तत्त्व आपल्याला निरोगी ठेवण्यात व सुंदरता वाढवण्यात मदत करतात. 
 
5. प्रदूषणापासून दूर राहा: आपण प्रदूषण मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. घरातून बाहेर निघताना नाक मास्कने झाकून घ्या. सकाळी शुद्ध वार्‍यात फिरा. 
 
6. पायी फिरा: दररोज अर्धा तास तरी पायी फिरा आणि सक्रिय राहा. एका जागी बसल्या बसल्या आपला 50 वयात फिट राहण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती